सातारा : मूळचे साताऱ्याचे असणारे पण सध्या दिल्ली येथे स्थायिक झालेले वैभव आगाशे हे नावाजलेले क्रीडा समुपदेशक आहे. त्यांनी कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे या तरुणाला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आवश्यक असणारे मेंटल ट्रेनिंग देऊन या स्पर्धकाला उत्तेजन दिले. आणि मग या तरुणाने ऑलिम्पिक स्पर्धेमधील नेमबाजीसाठी ब्रांझ पदक मिळवले. आणि साताऱ्याच्या वैभवात मानाचा तुरा रोवला. या निमित्ताने साताऱ्यातील रायफल असोसिएशन, हरी ओम ग्रुप, जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ सातारा, आणि निसर्ग प्रेमी मंडळी यांनी वैभव आगाशे यांचे समारंभ आयोजित करून त्यांचे अभिनंदन केले व त्यांना साताऱ्याला येण्याचे निमंत्रण केले आहे.
यावेळी श्रीनिवास कासट, नितीन सुपनेकर, श्रीकांत मसुते, चंद्रकांत शहा, जगताप, जयवंत, मोहन पुरोहित, दोषी, कथले आदींचे प्रमुख उपस्थिती होती.
सातारा शहरातून वैभव आगाशे यांनी समुपदेशन करून खऱ्या अर्थाने देशाला साताऱ्याचे नाव एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे त्यांचा एक विशेष सत्काराचा कार्यक्रम आयोजित करणार असल्यासाठीच हा अभिनंदनचा ठराव करण्यात आले असल्याचे उपस्थित आणि यावेळी सांगितले. यावेळी वैभव यांचे पिताश्री जेष्ठ माजी विक्रीकर आयुक्त विनायकराव आगाशे यांचा पुष्पगुच्छ देऊन या सर्व मान्यवरांनी सत्कार केला.