सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या पूर्वी राजेंद्र सिताराम चव्हाण (रा. निनाम, ता. सातारा) यांनी तेथीलच एका शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.
निनाम येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या; बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद
by Team Satara Today | published on : 26 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा