एक देश एक निवडणूक समितीचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद

by Team Satara Today | published on : 18 May 2025


कराड : ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाबाबत केंद्र सरकार कडून स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचे सदस्य 17 ते 19 मे दरम्यान तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. या समितीने राज्याचे गृह, अर्थ, विधि, शिक्षण, शिष्टाचार, निवडणूक या विभागांतील वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर तसेच राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. खा. पी.पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली 31 खासदारांची ही समिती सर्व राज्यांतील वरिष्ठ अधिकारी व राजकीय नेत्यांशी चर्चा करीत आहेत. आता ही समिती तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौर्‍यावर आहे.    

यावेळी समितीने माजी मुख्यमंत्री, सर्व प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेते यांच्याशी चर्चा केली. चर्चेवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांशी सविस्तर आणि दीर्घ चर्चा मुंबई येथे केली. यावेळी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, कॉंग्रेसचे खा. मनीष तिवारी, शिवसेनेचे खा. अनिल देसाई, आप चे खासदार संजय सिंह, भाजप खा. अनुराग ठाकूर, खा. संबित पात्रा, समाजवादी पार्टीचे आ. अबू आजमी, रासप नेते महादेव जानकर, आदीसह राज्यातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संयुक्त समितीसमोर एक देश एक निवडणूक या महत्वाच्या विधेयकाबाबत महत्वपूर्ण चर्चा करीत आपले मुद्दे मांडले.

एक देश एक निवडणूक देशासाठी योग्य कि अयोग्य याचा अहवाल समिती तयार करणार असून, समितीत भाजपचे 10, कॉंग्रेसचे 3, समाजवादी, तृणमूल कॉंग्रेस, डीमके, टिडीपी, राष्ट्रवादी, आरएलडी चे एकूण 21 सदस्य आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मला रोहित पवार यांची कीव येते
पुढील बातमी
शिवतीर्थ ही भविष्याची दृष्टी असणारी पुस्तिका

संबंधित बातम्या