04:32pm | Sep 10, 2024 |
नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याचे सामना 12 सप्टेंबरला होणार आहेत. या सामन्यांसाठी संघांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. कारण दुलीप ट्रॉफी खेळणाऱ्या काही खेळाडूंची वर्णी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी लागली आहे. त्यामुळे इंडिया ए, इंडिया बी आणि इंडिया सी संघ उलथापालथ झाली आहे. त्यामुळे या संघात अपेक्षित बदल करण्यात आले आहेत. शुबमन गिल याची वर्णी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात लागली आहे. त्यामुळे इंडिया ए संघाची धुरा मयंक अग्रवालच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे मयंक अग्रवालच्या नेतृत्वात दिग्गज खेळाडूंना खेळावं लागणार आहे. अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वातील इंडिया बी संघाने शुबमन गिलच्या नेतृत्वातील इंडिया ए संघाला पराभवाचं पाणी पाजलं होतं. स्पर्धेतील दुसरा सामना इंडिया ए आणि इंडिया डी या संघात होणार आहे. या दोन्ही संघानी स्पर्धेतील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी धडपड करताना दिसतील. हा सामना अनंतपूर येथे होणार आहे. यानंतर तिसऱ्या टप्प्यातील सामना 19 सप्टेंबरला होणार आहे.
इंडिया ए संघ: मयंक अग्रवाल (कर्णधार), रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, कुमार कुशाग्र, शास्वत रावत, प्रथम सिंह, अक्षय वाडकर, एसके रशीद, शम्स मुलानी, आकिब खान.
मयंक अग्रवाल दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण या संघातून शुबमन गिल, केएल राहुल, ध्रुव जुरैल, कुलदीप यादव आणि आकाश दीप हे खेळाडू भारतीय संघात खेळणार आहेत. त्यामुळे प्लेइंग 11 पाच खेळाडूंचा फटका बसणार आहे. प्लेइंग 11 मध्ये रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान असतील यात शंका नाही. तर पहिल्या सामन्यातील तनुष कोटियन आणि खलील अहमद यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इंडिया बी संघात यशस्वी जयस्वालच्या जागी रिंकु सिंहला संधी मिळाली आहे. ऋषभ पंतच्या जागी सुयश प्रभुदेसाई याला स्थान मिळालं आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |