सातारा : सातारा जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी विठ्ठल गणपती इनामदार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने हे दि. 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 15 मे 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्या व पदस्थापना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अमरावती विभागातील प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विठ्ठल इनामदार यांची सातारा येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शासन आदेशानुसार इनामदार यांना 30 मे रोजी त्यांच्या पूर्वीच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सोमवारी सातारा येथे हजर होत पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर इनामदार यांचा विविध अधिकारी, मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा पुरवठा विभाच्यावतीनेही सहायय्क पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशासकीय अनुभव, महसूल विभागातील विविध जबाबदार्या आणि चौकशी अधिकारी म्हणून केलेल्या कामकाजामुळे इनामदार यांच्याकडून सातारा जिल्ह्याच्या प्रशासनात प्रभावी योगदानाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.