सातारा : पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर स्वतःच्या आणि पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 9 जून रोजी दुपारी घडलेल्या या प्रकारात सॅमसन उर्फ बॉबी अँथोनी ब्रूक्स (रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी आरडाओरडा करत रॉकेल ओतल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करणार्या पोलिसांशी धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.