सातारा : गोडोली शाहूनगर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम गुरूकुल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, खेळ, राष्ट्रप्रेम यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येतात.
महागाव येथे 22 महाराष्ट्र बटालियन सातारा, हेड ऑफिस कोल्हापूर यांच्या माध्यमाने दिनांक १६ मे ते २७ मे व ३ जून ते १२ जून दरम्यान वार्षिक प्रशिक्षणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सातारा जिल्हातील विविध प्रकारच्या अनुदानित, विनाअनुदानित माध्यामातील ३२ विद्यालयातील एनसीसी छात्रांनी सहभाग नोंदवला.
या शिबिराचे आयोजन कमांडिंग ऑफिसर एम. ए. राजमन्नार (सेनामेडल), ॲडम ऑफिसर आनंद सिंग, सुभेदार मेजर तानाजी भिसे, जेसीओ पीआय स्टाफ आणि एएनओ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
शिबिरा दरम्यान बेस्ट स्कूल, बेस्ट ड्रील, बेस्ट सोलो ड्रील, बेस्ट कॅडेट्, ग्रुप डान्स, ग्रुप सॉंग, फायरिंग यासारखे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सातारा जिल्ह्यातील या एनसीसी शिबिरामध्ये सर्वात जास्त एकूण सांघिक ६ पारितोषिके आणि १८ वैयक्तिक मेडल्स मिळालेली गुरुकुल स्कूल ही एकमेव स्कूल ठरली. यासर्व स्पर्धांमध्ये गुरुकुलच्या कॅडेट्सने उज्ज्वल कामगिरी केली.
बेस्ट स्कूल स्पर्धा - प्रथम क्रमांक
बेस्ट ड्रिल स्पर्धा - प्रथम क्रमांक
बेस्ट ग्रुप डान्स – प्रथम क्रमांक
बेस्ट ग्रुप सॉंग – द्वितीय क्रमांक
बेस्ट कॅडेट् – स्वस्तीश्री राजपूत व स्वरा दड फायरिंग – सई जगदाळे, मधुरा शेलार, सत्यम चव्हाण, निर्जला पवार, प्रगती सावगावे
क्वार्टर गार्ड – प्रगती सावगावे, सई घाडगे, मुग्धेश कोडग, वेदांती जाधव, आर्या बेंद्रे, मधुरा शेलार, वैष्णवी साळुंखे, गुरुप्रसाद वेळेकर, सत्यम चव्हाण
बेस्ट सोलो ड्रिल – स्वरा दड, विराज शेलार
बेस्ट अँकरिंग - स्वस्तीश्री राजपूत, स्वरा दड
कॅम्प सिनीअर – श्रेया जाधव
पायलिटींग – राजवर्धन मोरे, ओजस जगताप
कॅम्प फोटोग्राफी – ओजस जगताप, ओंकार महामुलकर, शौर्य घाडगे
गेस्ट लेक्चर सहभाग – ओजस जगताप, विराज शेलार.
या यशाबद्दल गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र चोरगे, कमांडिंग ऑफिसर श्री. एम ए राजमन्नार (सेना मेडल) सुभेदार मेजर, श्री संभाजी भिसे यांनी कॅडेट्सचे अभिनंदन केले.
यावेळी सचिव आनंद गुरव, अॅड. ऐश्वर्या चोरगे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी श्री. विश्वनाथ फरांदे उपस्थित होते.
22 महाराष्ट्र बटालियनचे सीओ एम ए राजमन्नार यांनी ट्रूपचे विशेष कौतुक केले. एनसीसी ANO सौ. मेघा तपासे, एनसीसी प्रशिक्षक दत्तात्रेय येवले यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्सनी हे घवघवीत यश संपादन केले आहे.
यावेळी राजेंद्र चोरगे म्हणाले कि, विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रप्रेम व स्वयंशिस्त निर्माण होण्यासाठी चार वर्षापूर्वी शाळेमध्ये एनसीसी विभाग सुरु करण्यात आला. एनसीसीमुळे गुरुकुलचे कॅडेट्स भविष्यात राष्ट्राच्या सेवेत दिसतील असे आम्हा सर्वांना विश्वास वाटतो. सदर शिबिरामध्ये कॅडेट्सचे यश त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणारे असून शाळेसाठी ही अभिमानाची बाब आहे.
अर्जुन चोरगे, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल, राजेंद्र खंडेलवाल, अंबाजी देसाई, हरिदास साळुंखे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक पालक संघ सदस्य उपस्थित होते.