सातारा : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2022 ते 10 जून 2024 दरम्यान सुजाता रवी राठोड सध्या रा. चंदन नगर, कोडोली, सातारा या विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पती रवी धनु राठोड, सासू कस्तुरी धनु राठोड, सासरे धनु राठोड, नणंद सुब्बी शेट्टी चव्हाण, रेखा मंजुनाथ, देवी शिवाजी पवार, भागी विजू पवार सर्व रा. गुत्तरगी, लमाणतांडा, ता. सिंदगी, जि. विजयपूर, कर्नाटक यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक गोळे करीत आहेत.
विवाहितेचा छळ प्रकरणी सात जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 12 March 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव येथे गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या
August 14, 2026
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी वेळेच्या दुचाकी चालकावर गुन्हा
August 14, 2026