सातारा : समर्थ सदन समोरील विद्युत रोहित्र अचानक पेटल्याने राजवाडा परिसरातील लाईट सोमवारी पावण्याचा दरम्यान गुल झाली .आई दिवाळीच्या मुहूर्तावर अंधाराचा सामना करावा लागल्याने सातारकरांचा चांगला संताप झाला. खरेदीला बाहेर पडलेल्या सातारकरांना अंधारातच खरेदी करण्याची वेळ आली.
समर्थ सदन येथील पेटलेला डीपी जास्त आग भडकूनआग लागण्याची भीती होती. सतर्क सातारकरांनी तात्काळ राजवाडा येथील एम एस ई बी च्या कार्यालयाशी संपर्क साधून झालेल्या घटनेची कल्पना दिली. वीज वितरणच्या तांत्रिक विभागाने तात्काळ घटनास्थळी येऊन डीपीचा फ्युज काढल्याने सर्वत्र लाईट गेली होती. तब्बल अर्धा तास लाईट बिल झाल्याने मारवाडी चौक ते राजवाडा यादरम्यान अंधाराचे साम्राज्य होते.साताऱ्यात सोमवारी नरक चतुर्दशीचा पहिला सण साजरा झाला. खरेदीसाठी सातारकरांची रस्त्यावर प्रचंड गर्दी होती, तसेच मारवाडी चौक देवी चौक मोती चौक आणि गोलबाग परिसरामध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम आणि पोलिसांची बंदोबस्ताची धावपळ सुरू होती. अशावेळी चांदणी चौकातून समर्थ सदनकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारा डीपी साडेसात पावणे आठच्या दरम्यान अचानक पेटला.
आगीने काही वेळातच उग्ररूप धारण केले. छोट्या स्फोटासारखा आवाज होऊन परिसरातील संपूर्ण लाईट गायब झाली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या डीपीचे मोबाईल चित्रण करून ते तात्काळ वीज वितरण विभागाच्या तांत्रिक पथकाला पाठवले. गोलबाग परिसरामध्ये अचानक लाईट गेल्याने किरकोळ विक्रेत्यांची चांगलीच पंचायत झाली. काही दुकानांमधून तत्सम जनरेटर डीपी सारख्या यंत्रणा सुरू झाल्या.मात्र लाईट येईपर्यंत वातानुकूलन यंत्रणा बंद झाल्याने सातारकरांचा घामटा निघाला.तांत्रिक पथकाने आठ वाजता घटनास्थळी येऊन डीपीचा फ्युज बदलला आणि तेथील विद्युत प्रवाह पुन्हा सुरळीत केला .यापुढे असे ऐन गडबडीच्या वेळी तांत्रिक अडचणी घडू नयेत अशी अपेक्षा सातारकरांनी व्यक्त केली.