हे 15 खेळाडू आयपीएल 2025 मध्ये अनसोल्ड राहिल्यामुळे संपूर्ण जग चकित

by Team Satara Today | published on : 26 November 2024


नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे मेगा लिलाव झाला, यामध्ये काही खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत आयपीएल इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने २७ कोटींना विकत घेतले आहे. तर आयपीएल २०२४ च्या विजेत्या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सने २६.७५ कोटींना विकत घेतले. मेगा ऑक्शनमध्ये अनेक फ्रॅन्चायझींमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. या कालावधीत सर्व १० संघांनी एकूण ६३९.१५ कोटी रुपये खर्च करून १८२ खेळाडूंना खरेदी केले. मात्र, लिलावासाठी ५७७ खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरला २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. हे तिन्ही खेळाडू आपापल्या संघाचे कर्णधारही होऊ शकतात, असे मानले जात आहे.

अनेक खेळाडूंवर फ्रॅन्चायझींनी कोट्यवधी उधळले तर काही स्टार खेळाडूंना संघानी घेतलेच नाही. अशा स्थितीत अनेक स्टार खेळाडू होते ज्यांना लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नाही. एकाही संघाने लिलावात जागतिक क्रिकेटचे १५ स्टार खेळाडू खरेदी करण्यात रस दाखवला नाही हे पाहून संपूर्ण जगाला आश्चर्य वाटले.

पहिल्या दिनीं अनेक मोठ्या नावांचा समावेश होता, यावेळी मोठ्या खेळाडूंना विकत घेण्यासाठी संघामध्ये लढत सुरु होती. यामध्ये अय्यरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला होता, त्याला केकेआरने गेल्या लिलावात २४ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले होते. आयपीएल २०२५ च्या लिलावात मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने ११ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले.

श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे १४ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२५ हंगामात आपापल्या संघांचे कर्णधार होऊ शकतात. अर्शदीप सिंगला राईट टू मॅच कार्ड वापरून पंजाबने १८ कोटी रुपयांना विकत घेतले. सर्वाधिक ११०.५ कोटी रुपयांचा लिलाव जिंकणाऱ्या पंजाबने लेगस्पिनर युझवेंद्र चहलला १८ कोटी रुपयांना आणि मार्कस स्टोइनिसला ११ कोटी रुपयांना विकत घेतले. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लियाम लिव्हिंगस्टोनवर ८ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले. यावेळी पर्स १२० कोटी रुपयांची होती, जी तीन वर्षांपूर्वी झालेल्या मेगा लिलावापेक्षा ३० कोटी रुपये जास्त होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नासा’ने सुनीता विल्यम्सच्या सुटकेसाठी ‘पाठवले ‘हे’ अंतराळयान
पुढील बातमी
‘वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

संबंधित बातम्या