सातारा : अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी बोरगाव पोलिसांनी दोन जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी पाडळी ता. सातारा गावच्या हद्दीत एका हॉटेलच्या भिंतीच्या आडोशाला वैभव सर्जेराव पवार (रा. मांडवे, ता. सातारा) हा अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 1120 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या कारवाईत, वेणेगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत तेथीलच चंद्रकांत दिनकर सावंत हे राहत्या घराच्या आडोशाला अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून आठशे रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
वेणेगाव व पाडळी गावच्या हद्दीतअवैधरित्या दारू विक्री प्रकरणी दोन जणांवर कारवाई
by Team Satara Today | published on : 12 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा