सातारा : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा येथे वैद्यकीय अध्यापन व रुग्णसेवा देण्यासाठी विविध विषयांतील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक ही पदे करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
या पदांसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) विहीत केलेली आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. शासकीय, निमशासकीय तसेच अन्य क्षेत्रांतील इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेस अर्ज करता येणार आहे.
या संदर्भातील सविस्तर जाहिरात www.med-edu.in व www.gmcsatara.org या संकेतस्थळांवर दि. २३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दि. २७ जानेवारी २०२६ ते दि. ०३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राहणार आहे. दरम्यान, पदसंख्या किंवा पदांमध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो, असेही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळांवरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी केले आहे.