आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी

उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे : मंत्री जयकुमार गोरे

by Team Satara Today | published on : 30 December 2024


सातारा : आंधळी उपसा सिंचन योजनेमुळे माण तालुक्यातील गावांमधील शेतीच्या सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. 

माण तालुक्यातील आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी केली. याप्रसंगी केंद्रीय जल आयोग पाणी प्रकल्प सदस्य नवीन कुमार, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता अमोल निकम, विजय पाटील आदी उपस्थित होते.

गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना पूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाने मोठी मदत केलेली आहे.  माण तालुका हा दुष्काळी तालुका आहे. जानेवारी महिन्यापासून या तालुक्यातील लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आंधळी उपसा सिंचन योजना याअंतर्गतच येत असून हे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा निर्माण होणार आहेत. आंधळी उपसा सिंचन काम गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण करावी, असेही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी पाहणी दरम्यान सांगितले. 

जल आयोग पाणी प्रकल्प सदस्य कुमार म्हणाले, आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम गतीने व गुणवत्ता पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग यांचेकडून अमर जवान स्मृतीस्तंभावर अभिवादन

संबंधित बातम्या