सातारा : सकाळी झालेल्या वादातून रात्री दोघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना माची पेठ, सातारा येथे घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र मिसाळ याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. हल्ल्यात तक्रारदार नंदा पोपट सुतार (वय 60) व त्यांचा मुलगा राकेश सुतार हे जखमी झाले आहेत. हल्ल्याची घटना दि. 31 रोजी घडली आहे. संशयिताने कोयत्याने वार केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.