सातारा : दारूच्या दुकानातून दारूसह रोख रकमेची चोरी केल्याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संभाजी राजाराम पवार (रा. कोरेगाव, सातारा) यांच्या देशी दारू दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील पंधरा हजार रुपये रोख व 660 रुपये किमतीच्या बियरच्या बाटल्या असा एकूण 15 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यां विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत आहेत.
दारूच्या दुकानातून दारूसह रोख रकमेची चोरी; दोन अज्ञात चोरट्यांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा