01:11pm | Sep 16, 2024 |
जालना : मराठा आरक्षणासाठी मी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात करत आहे. ही मराठा समाजाने राज्य सरकारला दिलेली आणखी एक संधी आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. आम्हाला या माध्यमातून कोणतेही राजकारण करायचे नाही. आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा. मागच्या उपोषणापर्यंत सरकार आमची दखल घेत होतं. आता तुम्ही या अगर येऊ नका, आपण आपली प्रक्रिया राबवत असतो. कोणी आले म्हणून आंदोलन होत नसते. पण राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण) दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. ते सोमवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आजपासून मी राजकीय विषयावर बोलणार नाही. मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत बघत नाही. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. त्यामुळे राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही. राज्य सरकारने आमच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नंतर बोंबलू नये. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील काही माकडांना सांगावे की, जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
राज्य सरकारकडून धनगड (Dhangad) आणि धनगर (Dhangar) एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मनोज जरांगे यांनी भाष्य करताना म्हटले की, सरकारने केलेली गोष्ट चांगली आहे. त्यांची मागणी आजची नाही. त्यांच्या मुलांना आणखी फायदा होईल. त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून ST मधून आरक्षण मिळाले पाहिजे. सर्व बांधवांनी ताकदीने पंढरपूरच्या उपोषणाला पाठिंबा दिला पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
त्यांच्या पाठीशी मराठा समाजाने उभे राहिले पाहिजे. छगन भुजबळने पंढरपुरला जावं आणि धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. धनगर बांधवांना विनंती आहे की, उगाच भांडण विकत घेऊ नका, भुजबळांशी भांडण करू नका. छगन भुजबळ बुद्धीभेद करून दंगली घडवणार आहेत. एकाही धनगर आणि ओबीसी नेत्यांना मी दोष दिला नाही. पण भुजबळांना फक्त दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |