दहशतीचा प्रयत्न केल्याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा

सातारा : सातारा जिल्हा कारागृहातून अर्थव अजय पवार रा. कोरेगाव यास जामीन मंजूर झाल्यानंतर त्याच्यासह 9 जणांनी दुचाकीवरुन रॅली काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत व्हिडीओ काढुन तो व्हिडिओ इंन्स्टाग्रॅमवर टाकल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पो. कॉ. सचिन रिटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अर्थव अजय पवार रा. कोरेगाव हा न्यायालयीन कोठडीत होता. त्यास दि. 18 जानेवारी रोजी न्यायालयाने जामीन दिला. त्याचा जामीन मंजूर झाल्यानंतर जिल्हा कारागृहातून तो बाहेर आल्यानंतर त्याचे मित्र निखील बर्गे, अक्षय बर्गे, राधेश्याम कदम, राज पवार यांच्या 9 जण त्याला नेण्यासाठी आले होते. अथर्व पवार हा बाहेर आल्यानंतर बेकायदेशीर सातारा शहरात जमाव जमवून त्यांनी दहशत निर्माण करत चिथावणीखोर घोषणा देत 6 दुचाकीवरुन सातारा शहरातून कोरेगावकडे गेले. त्याचा व्हिडीओ करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून याचा तपास महिला पोलीस नाईक शिंदे या तपास करत आहेत.



मागील बातमी
खंडणीसह जबरी चोरी प्रकरणी 13 जणांवर गुन्हा
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात 5286 विशेष कार्यकारी अधिकार्‍यांची होणार नियुक्ती

संबंधित बातम्या