तासवडेमध्ये माजी आमदार बाळासाहेब पाटील गटाला खिंडार; संजय जाधव यांच्यासह सोसायटीच्या सर्व संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश

by Team Satara Today | published on : 08 December 2025


कराड : तासवडे विकास सेवा सोसायटीचे पॅनल प्रमुख संजय जाधव यांच्यासह चेअरमन व सर्व संचालकांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा माजी आमदार बाळासाहेब पाटील गटाला मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे उंब्रज गटातील आमदार मनोजदादा घोरपडे यांची ताकद वाढलेली आहे.

केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच कराड उत्तर मध्ये जास्तीत जास्त भाजपा प्रवेश होत आहेत.

 गेल्या एक वर्षांमध्ये आमदार मनोजदादा घोरपडे घोरपडे यांनी ज्या पद्धतीने कामाचा धडाका लावलेला आहे. आणि ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांच्यात मिसळून जनसंपर्क करत आहेत या त्यांच्या कामाच्या पद्धती वरती अनेक जण प्रभावित होऊन भाजपा प्रवेश करत आहेत. यावेळी संजय जगदाळे पॅनल प्रमुख नथुराम पाटील चेअरमन शहाजी पाटील  संभाजी जाधव संचालक युवराज  जाधव माजी चेअरमन विश्वनाथ जाधव व्हा. चेअरमन धर्मेंद्र जाधव मा. व्हा.चेअरमन शंकर जाधव मा. व्हा.चेअरमन तानाजी चव्हाण संचालक भगवान खरात संचालक सुनिता जाधव मा. चेअरमन अरुण पवार मा. संचालक युवराज जाधव मा. संचालक अशोक खरात मा. ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील मा. चेअरमन वसंत जाधव मा  चेअरमन उत्तम जाधव सरंग जाधव विलास भाऊजी शहाजी जाधव मोहन जाधव अनिकेत जाधव युवराज जाधव अमर जाधव तेजस जगदाळे बाजीराव जाधव तुषार जाधव भिकाजी जाधव संदीप जाधव शंकर पाटील आदींचा भाजपा प्रवेश झाला.

यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्यामुळे विकासास कुठेही कमी पडणार नाही. आपल्या गावातील आमचे जुने सहकारी  आणि आपल्या सर्वांचा समन्वय साधून सर्वांना योग्य सन्मान राखला  जाईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दाभोळकर, पानसरे मारेकऱ्यांचे सूत्रधार पकडणार की नाही - मेघा पानसऱ्यांचा सवाल; भिमाई पुरस्कार संघर्षशील स्त्रियांना अर्पण
पुढील बातमी
शेकोटी उत्सवाच्या निमित्ताने बालपणीच्या आठवणीत रमल्या अंगणवाडीताई: महाराष्ट्रातील पहिला अनोखा उपक्रम साताऱ्यात

संबंधित बातम्या