साताऱ्यातील उंबरकर टोळीचे दोघे दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आदेश

by Team Satara Today | published on : 03 October 2025


सातारा  : सातारा शहरांमध्ये कायदा सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या उंबरकर टोळीतील दोघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे .हद्दपार प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी हे आदेश दिले आहेत.स्मितेश उर्फ सागर दिलीप उंबरकर (वय  28 , रा.  मोळाचा ओढा, सैदापूर ता. सातारा) व नरेश शेरसिंग सुनार (वय 19 , रा.  शुक्रवार पेठ सातारा) अशी या दोघांची नावे आहेत. 

या दोघांच्या तडीपार प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा राजीव नवले यांनी चौकशी केली होती. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळीप्रमुख उंबरकर व सदस्य याच्यावर दरोडा टाकणे, जबरी चोरी,खंडणी, बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे, अवैध शस्त्रांचा वापर, लोकांवर कोयत्याने वार यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते. त्यांना वेळोवेळी अटक करून तसेच प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या .सातारा तालुका परिसरातील लोकांना या टोळीचा उपद्रव होत होता. या दृष्टीने शाहूपुरी पोलिसांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची हद्दपार प्राधिकरणासमोर होऊन पोलीस अधिनियम 55 नुसार या दोघांना दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ.  वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सणस, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सचिन माने, राहुल दळवी, केतन शिंदे यांनी योग्य तो पुरावा सादर केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दारू पिऊन आरडाओरडा करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा
पुढील बातमी
महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पाळावे: रणजित देशमुख

संबंधित बातम्या