सातारा : सातारा-लोणंद महामार्गावरील देऊर, ता. कोरेगाव येथील दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. सचिन भानुदास अहिरे रा. हिंगणगाव, ता. फलटण असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन अहिरे हे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत होते. ते रजा घेऊन गावी आले होते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मित्र प्रफुल्ल खलाटे रा. खुंटे, ता. फलटण असे दोघेजण दुचाकी क्र. एमएच 11 सीई 6238 वरून सातारा दिशेने जात होते. दरम्यान बिचुकले फाटा येथे पुढे चाललेल्या दुचाकीला त्यांची धडक बसली.
या अपघातात ते दोघे रस्त्यावर पडले. दरम्यान,