सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, पाटण येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत सर्व विद्यार्थिनींच्या उत्साही सहभागाने नैसर्गिक घटकांचा वापर करून आकर्षक रांगोळी तयार करण्यात आली. या प्रसंगी सर्व विद्यार्थिनींनी एकत्र जमून झाडे वाचवा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा अशा घोषणा देत पर्यावरण व वृक्ष संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.
उपक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी तयार केलेल्या रांगोळीभोवती मानवी साखळी तयार करून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी काही विद्यार्थिनींनी पर्यावरणाप्रति आपले विचार व जनजागृतीपर मनोगत व्यक्त केले.
वसतिगृह अधीक्षक श्रीमती आर. आर. नायकवडी यांनी उपस्थितांशी संवाद साधताना १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर माहिती दिली. या महिन्याभराच्या काळात वसतिगृहाच्या माध्यमातून कोणते विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबवता येतील, याविषयी त्यांनी विद्यार्थिनींशी सविस्तर चर्चा केली. या कार्यक्रमास वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण येथे सावित्रीबाई फुले वसतिगृहात रांगोळी स्पर्धा व पर्यावरण संवर्धन शपथ
by Team Satara Today | published on : 28 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा