पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सव राज्यभर नाही देशभरात लोकप्रिय आहेत. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील लोक येतात. दहा दिवस भाविकांच्या गर्दीने पुण्यातील रस्ते भरुन गेले असतात. यंदा पुण्यातील एका गणेश मंडळाने साकारलेल्या गणेशोत्सवातील देखाव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. अमृतसर येथील ‘गोल्डन टेम्पल’चा देखावा या मंडळाकडून उभारण्याचे काम सुरु आहे. त्याला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून (SGPC) विरोध दर्शवला आहे. श्री हरमंदिर साहिबची कॉपी करता येणार नसल्याचे प्रबंधक समितीने म्हटले आहे. त्यासाठी आज शुक्रवारी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रतिनिधी मंडळ येत आहे. समितीकडून मंडळावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, असे वृत्त मिडियाने ’ने दिले आहे.
पंजाबमधील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने अमृतसर सुवर्ण मंदिराच्या देखाव्याला आक्षेप घेतला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाने उभारण्याचे काम सुरु केले आहे. त्यालाच गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. कमिटीचे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी म्हटले की, अमृतसरचे सुवर्ण मंदिर हे शिखांचे पवित्र स्थळ आहे. त्यामुळे गणेश मंडळ त्याचा देखावा सादर करु शकत नाही. या प्रकारामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जातील. ही गोष्ट शीख परंपरा आणि मुल्यांच्या विरोधात आहे. गुरुद्वाराच्या प्रतिकृतीच्या चौकशीसाठी अमृतसर येथून एक टीम पुण्याला पाठवली आहे, असे शिखांच्या सर्वोच्च धार्मिक कमिटीने म्हटले आहे.
दरम्यान, गुरुवारी मंडळात सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्याचे काम जोरात सुरू होते. कारागिरांनी भव्य वास्तूंवर सोनेरी रंग लावणे सुरु केले होते. कॅम्प येथील गुरुद्वारातील विश्वस्तांनी मीडियाला सांगितले की, मंडळाच्या बांधकामात त्यांची कोणतीही भूमिका नाही. सुवर्ण मंदिराची प्रतिकृती योग्य प्रकारे केले जात आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांना मंडळाने आमंत्रित केले होते. त्यावेळी आम्हाला ते अचूक दिसले. आम्हाला तर उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु अमृतसरहून फोन आला की, सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यासाठी मंडळाला परवानगी दिली नाही.
छत्रपती राजा राम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर म्हणाले, सुवर्ण मंदिर आमच्यासाठी आदराचे आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. आम्ही नांदेडच्या गुरुद्वाराला 12 जुलै रोजी यासंदर्भात पत्र देखील पाठवले. या पत्रांमध्ये आमच्या गणेश मंडळासाठी सुवर्ण मंदिराची प्रतिकृती तयार करण्यासाठी आशीर्वाद मागितले होते. आम्ही पुण्यातील सर्व 40 गुरुद्वारांकडे पाठपुरावा करुन आमची कल्पना सांगितली. त्यानुसार आम्ही आमचे नियोजन केले. गणेश मंडळ प्रतिकृती उभारण्यासाठी दोन-तीन महिने लागतात. आम्ही काहीही चुकीचे होऊ देणार नाही.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत तीन युवती बेपत्ता |
अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
माझ्या माघारीचे दोर जनतेने केव्हाच कापलेत : अमितदादा कदम |
सातारा शहरात विसर्जन मिरवणूक तयारीची लगबग |
तृतीयपंथी प्रेयसीचा प्रियकराने काढला कायमचा काटा |
मूकबधीर विद्यार्थ्यांचा माण नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडून मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तृतीयपंथी प्रेयसीचा प्रियकराने काढला कायमचा काटा |
मूकबधीर विद्यार्थ्यांचा माण नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडून मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |