खटावच्या शिवारात पाणी आणण्याचे स्वप्न पूर्ण केले; महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा - आ. महेश शिंदे; नेर उपसा सिंचन योजनेचे जलपूजन, भूमिपूजन

by Team Satara Today | published on : 19 November 2025


खटाव : गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टच्या माध्यमातून जिहे-कठापूर जलसिंचन योजनेला गती मिळाली आणि ती पूर्ण झाली. या उपसा सिंचन योजनेचा पहिला व दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे खटाव उत्तर भागातील शिवारात पाणी पोहचले आहे. त्यामुळे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. दिलेला शब्द पूर्ण केला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघ शंभर टक्के सिंचनाखाली आणण्याचा मानस आहे. महायुती सरकारने कायम न्याय दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे प्रतिपादन आ. महेश शिंदे यांनी केले.

फडतरवाडी (ता. खटाव) येथे गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर) अंतर्गत नजर उपसा योजना टप्पा क्रमांक १ व २ चे जलपूजन आणि टप्पा क्रमांक ३ व ४ चे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लवकुमार मदने, भाजप तालुकाध्यक्ष शिवाजी शेडगे, मधुकर पाटोळे, डॉ. प्रिया शिंदे, संतोष वाघ, रणधीर जाधव, जी डी खुस्पे, पोपटराव भराडे, बाळासाहेब जाधव, शंकर कदम, तानाजी फाळके, सरपंच चारुशीला इंजे, उपसरपंच नवनाथ खुस्पे, उपसरपंच अभयराजे घाडगे, उपसरपंच महेश नलवडे, सरपंच सुजाता बोराटे, संगीता शिंदे, दीपाली मुळे, प्रभावती भराडे, राहुल देशमुख, हरिश्चंद्र सावंत, नवनाथ वलेकर, गणपतराव शिंदे, राजनंदिनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. महेश शिंदे म्हणाले, जिहे-कठापूर योजनेला कै लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव दिले. केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेतली. प्रचंड अडचणीतून मार्ग काढत कृष्णा खोरे योजनेचे फेर नियोजन केले. वंचित गावांना पाणी देण्याची भूमिका होती. त्यासाठी जनआंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाने दखल घेतली. मी कृष्णा खोरे विकास महामंडळाचा उपाध्यक्ष असताना १ ऑक्टोबर २०२३ रोजी जी आर निघाला त्यामुळे कोरेगाव मतदार संघ हा ९८ टक्के सिंचनाखाली आला, याबद्दल समाधानी आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे सहकार्य केले. त्यामुळेच आज जनता सुखी होतेय याचा मला आनंद वाटत आहे.

भरत मुळे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी बाळासाहेब सावंत, सुसेन जाधव, सचिन चव्हाण, राजेंद्र भगत, शशिकांत रोमन, कॅ बबनराव धुमाळ, आण्णा वलेकर, दिपक विधाते, त्यांना खुस्पे, श्रीकांत खुस्पे, साहेबराव खुस्पे, विजय शिंदे, सुनिल माने, नवनाथ साळुंखे, विजय मोहिते, सत्यवान साळुंखे, हणमंत शिंदे, मंदार माळी,

विविध गावचे सरपंच, उपसरपंच, शेतकरी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. उपसरपंच अभयराजे घाटगे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.

शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आलं

फडतरवाडीच्या टेकडीवरच्या माळरानावर पाणी आलं अन् खटावकरांनी एकच जल्लोष केला. हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी झाली. दुष्काळाचा शिक्का माथी असलेल्या शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आलं. प्रचंड उत्साहात झालेल्या जल व भूमिपूजन सोहळ्यात दिव्यांग आपल्या अपंगत्वावर मात करत सहभागी झाले होते. एक पाय नसतानाही वाॅकरचा आधार घेत सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी 'विक्रम' दगड-माती तुडवत धुरळ्यातून चालत आला होता. पाणी आल्यामुळे आपली पुढची 'पिढी' स्वतःच्या पायावर निश्चितपणे 'उभी' राहील हा विश्वास त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाच हजारांच्या लाचप्रकरणी तत्कालीन दुय्यम निरीक्षकाला ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा; तत्कालीन कॉन्स्टेबलची निर्दोष मुक्तता
पुढील बातमी
वाई नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा स्वबळाचा नारा; भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय; पत्रकार परिषदेत उमेदवार जाहीर

संबंधित बातम्या