सातारा : अवैधरित्या जनावरांची वाहतूक करुन प्राण्यांना क्रुरतेने वागवल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ताहीर, जफर, बाळू वाघमारे, मोहम्मदअली यांच्या विरुध्द पोलीस विजय घाटगे यांनी तक्रार दिली आहे. पिरवाडी ता.सातारा येथे दि. 21 मे रोजी कारवाई केली आहे. पोलिसांनी ट्रक, म्हशी, रेडे ताब्यात घेतले आहेत.