संभाजीनगरमधील दोघांना मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 22 October 2026


सातारा : दोन जणांना विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांनी विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. 19 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर येथील बाजार समितीच्या पाठीमागे राहुल धोत्रे व अतुल सिद्धार्थ शेडगे (रा. संभाजीनगर सातारा) हे दांडिया बघत असताना राहुल भोरे (रा. संभाजीनगर सातारा) व अनोळखी दोन ते तीन मुलांनी येऊन धोत्रे व शेडगे यांना लाकडी दांडके व स्टीलच्या राॅड ने मारहाण केली. याप्रकरणी संबंधितांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ढोल पथकातून बाहेर पडल्याच्या कारणावरून साताऱ्यात एकास मारहाण; तिघांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या