सातारा : सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथील २२ वर्षीय तरुणी वैष्णवी शरद जाधव ही घरातून दि. ११ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कॉलेजला फॉर्म भरण्यासाठी जात असल्याचे सांगून निघून गेली. ती अद्याप परत घरी न आल्याने तिचा शोधा शोध घेतला, मात्र ती कोठेही मिळून आली नाही. याप्रकरणी रमेश विलास जाधव (वय ५९, रा. चिंचणेर निंब,सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करत आहेत.
कॉलेजला फॉर्म भरण्यासाठी गेली ती, परत आलीच नाही; सातारा तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद
by Team Satara Today | published on : 12 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा