सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता

by Team Satara Today | published on : 10 June 2026


सातारा : वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजवडी येथील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिक सदाशिव जिजाबा सपकाळ हे 7 मे रोजी सकाळी घरातून निघून गेले होते. मात्र त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतला, तरीही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. याबाबत विजया जयसिंग जगदाळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत, वडूथ येथील 35 वर्षीय इंद्रजीत मोहन जाधव हे 9 मे रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. मोहन शंकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार गोरे पुढील तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्रीमती शांताबाई कदम यांचे निधन
पुढील बातमी
संशयास्पद दुचाकी ताब्यात; सातारा शहर पोलीस ठाण्यात दोनजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या