सातारा : विनाकारण मारहाण प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आंबवडे बु., ता. सातारा येथील विमल बाजीराव धोंडवड या वृद्धा घराच्या अंगणात बसलेल्या असताना विनाकारण लोखंडी रॉड ने त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केल्याप्रकरणी तेथीलच आत्माराम शंकर जाधव यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत.