अभिनेत्री खुशबू तावडे ही दुसऱ्यांदा आई होणार असून तिने मालिकेतून घेतला निरोप  

by Team Satara Today | published on : 10 August 2024


मुंबई  : अभिनेत्री खुशबू तावडे ही मागील वर्षभरापासून 'सारं काही तिच्यासाठी' ( या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली येत आहे. पण आता एका खास कारणासाठी खुशबूने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खुशबूने अभिनेता संग्राम साळवीसोबत  2018मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये एका मुलाला जन्म दिला. आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री गोड बातमी देणार आहे. 

प्रत्येक स्त्री प्रमाणे खुशबूने आपला गरोदरपणाचा सात महिन्यांचा प्रवास हा  काम करत पूर्ण केला. दरम्यान आता खुशबू या मालिकेता निरोप घेणार असून अभिनेत्री पल्लवी वैद्य आता उमा हे पात्र साकारणार आहे. नुकतच सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर खुशबूला निरोप देण्यात आला. 

8 महिन्यांचा प्रवास छान पार पडला : खुशबू

खुशबूने तिच्या या प्रवासाविषयी बोलताना म्हटलं की,  'जुलै 2023 मध्ये ह्या मालिकेच चित्रीकरण सुरु केले होत आणि पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी मला प्रचंड प्रेम दिलं. पण या आठ महिन्यांच्या प्रवासात एक नवीन खुशबू मला सापडली.त्यासाठी मी प्रोडक्शन हाऊस आणि झी मराठीचे खूप खूप आभार मानेन. जसं ही बातमी मी माझ्या घरच्यांना सांगितली त्यांना जितका आनंद झाला तितकाच माझ्या झी मराठीच्या कुटुंबाला सुद्धा  झाला.पूर्ण टीम, डायरेक्टर सर , सह कलाकार, कॅमेरा मागची आमची टीम सर्वानी खूप छान साथ दिली म्हणून हा 8 महिन्यांचा प्रवास छान पार पडला.'

तरीही मालिकेवर माझा तितकाच जीव : खुशबू

'उमाचा प्रवास पुढे पल्लवी वैद्य सांभाळणार आहे, नवीन उमाची  भूमिका पल्लवी वैद्य साकारणार आहे. मला प्रचंड आनंद होतोय की पल्लवी सारखी एक उत्तम कलाकार ही भूमिका साकारणार आहे. माझी कायम ह्या मालिकेसाठी ही इच्छा आहे की मालिकेचा पुढचा प्रवास सुंदर होऊ दे कारण मला 'सारं काही तिच्यासाठी' ने भरभरून दिले आहे. जरी मालिकेला मी आता निरोप देत असली तरीही मालिकेवर माझा तितकाच जीव असणार आहे', असं खुशबूने म्हटलं. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात
पुढील बातमी
मुलाचा मोठा खुलासा, शेख हसीना अजूनही बांगलादेशच्या पंतप्रधान?

संबंधित बातम्या