सातारा : सरताळे तालुका जावळी येथे राज इंडियन हॉटेल मध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या तीन इसमांच्या विरोधात मेढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 कलम चार व पाच नुसार गुन्हा नोंद करून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
जावळी तालुक्यातील सरताळे गावच्या हद्दीतील राज इंडीयन हॉटेल / लॉज येथे कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने आज छापा टाकला. त्यात तिघांवर कारवाई केली आहे.
लॉजमालक सचिन तुकाराम भिसे, कामगार सुरज नंदकुमार भिसे (दोघे रा. सरताळे) यांना ताब्यात घेतले आहे. रावेश शेट्टी (रा. उडपी, कर्नाटक) हा फरार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सातारा जिल्ह्यात बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत.
अरुण देवकर यांनी त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखा सातारा अंतर्गत असणाऱ्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांना बेकायदेशीर चालणाऱ्या कुंटणखान्याची माहिती प्राप्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
दि. २८ रोजी डॉ. वैशाली कडुकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सरताळे गावचे हद्दीतील राज इंडीयन हॉटेल / लॉज चालक मालक यांनी वेश्यागमनासाठी मुली ठेवल्या आहेत. ते मागणी केल्याप्रमाणे त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरवितात. त्याप्रमाणे पथकाने राज इंडीयन हॉटेल / लॉज येथे छापा टाकला.
वेश्यागमनाचा मोबदला स्वत:च्या उपजिविकेसाठी स्विकारुन, पिडीत महिलांना ग्राहकांसाठी वेश्यागमनासाठी उदयुक्त करुन, वेश्या व्यवसायाच्या कमाईतील मिळकतीवर अवलंबून राहून, वेश्या व्यवसायास प्रेरणा देणारा लॉजमालक सचिन तुकाराम भिसे याच्यासह सुरज नंदकुमार भिस, रावेश शेट्टी यांच्यावर विरुध्द मेढा पोलीस ठाण्यात मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच ४ पिडीत महिलांची सुटका केली आहे.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, मेढा पोलीस ठाण्याच्या अश्विनी पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस अंमलदार शरद बेबले, प्रवीण फडतरे, अरुण पाटील, शिवाजी गुरव, विक्रम पिसाळ, मोनाली निकम, क्रांती निकम, मेढा पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार जनार्दन गायकवाड, रफिक शेख, नंदकुमार कचरे, विजय शिंदोलकर, वाई पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार श्रवण राठोड, नितीन कदम यांनी कारवाई केली.