नौशेरा येथे एलओसीजवळ गस्त घालत असताना सुरुंगाचा स्फोट

लष्कराचे ६ जवान जखमी

जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराचे जवान गस्त घालत असताना सुरुंगाचा मोठा स्फोट झाला. या  स्फोटामध्ये भारतील लष्कराचे सहा जवान जखणी झाले आहेत. आज सकाळी १०.४५ च्या सुमारास हा स्फोट झाला. दरम्यान जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ ५/३ गोरखा रायफल्सचं एक पथक खंबा किल्ला येथे नियमित गस्त घातल होतं. त्यावेळीच तिथे एका  सुरुंगाचा स्फोट झाला. या स्फोटात एकून सहा जवान जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांमध्ये  हवालदार एम. गुरुंग (४१), हवालदाल जे. थप्पा (४१), हवालदार जंग बहादूर राणा (४१), हवालदार आर. राणा (३८), हवालदार पी. बद्र. राणा (३९), हवालदार व्ही. गुरुंग(३८) यांचा समावेश आहे.

या स्फोटात जखमी झालेल्या सर्व जवानांना उपचारांसाठी १५० जनरल रुग्णालय राजौरी येथे नेण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांना किरकोळ दुखापती झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  

मागील बातमी
महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांची झाशीच्या रेल्वे स्थानकावर मोठी चेंगराचेंगरी
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा

संबंधित बातम्या