क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त लिंब शेरीत ६१ जणांचे रक्तदान

by Team Satara Today | published on : 02 January 2026


सातारा : लिंब शेरी, ता. सातारा  येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंती निमित्त महात्मा फुले प्रतिष्ठान तर्फे सलग पाचव्या वर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 61 जणांनी रक्तदान केले. यामध्ये आठ महिलांचा सुद्धा समावेश आहे. 

रक्तदान शिबिराचा प्रारंभ अक्षय ब्लड बँक साताराचे रक्त संकलन अधिकारी संदीप सकटे तसेच प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम शिंदे, उत्तम शिंदे, परशुराम सुद्रिक, सौरभ वर्णेकर  धनंजय शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला. 2026 चे लिंब गावचे पहिले रक्तदाते म्हणून पोपट शिंदे यांनी रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर प्रतिष्ठान तर्फे सर्व रक्तदात्यांना सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमा तसेच आकर्षण वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या शिबिरासाठी महात्मा फुले प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात ; शनिवार, दि. 3 जानेवारी रोजी नटराज- शिवकामसुंदरी देवीचा कल्याणोत्सव अर्थात लग्नसोहळा
पुढील बातमी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर भ्याड हल्ला

संबंधित बातम्या