सातारा, दि. 14 : पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निवडीमुळे मराठी साहित्य विश्वात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात महामंडळाचे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महामंडळाच्या चारही घटक संस्था संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष पदासाठी विविध संस्थांनी सुचवलेल्या नावांवर सखोल चर्चा झाली. यात विश्वास पाटील यांच्या नावाला बहुतांश सदस्यांनी पाठिंबा दिला. विश्वास पाटील यांचे साहित्यिक योगदान आणि मराठी साहित्यातील त्यांचा भरीव कार्याचा विचार करून त्यांच्या नावावर शिक्का मुहूर्त करण्यात आले ही निवड सर्वानुमते झाल्याने साहित्य विश्वास एक मताचे वातावरण आहे.
साहित्यिक वारसा : विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांची पानिपत ही कादंबरी मराठी साहित्यातील महिलाचा दगड मानली जाते. या कादंबरीने मराठ्यांच्या ऐतिहासिक पराक्रमाला आणि पाणीपतच्या युद्धातील करून प्रसंगांना सजीवपणे उभे केले आहे. ऐतिहासिक कादंबरी लेखनात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या लेखन शैलीने आणि सखोल संशोधकांनी मराठी साहित्याला नवी उंची प्राप्त झाली आहे सातारा येथे होणाऱ्या संमेलनात त्यांचे नेतृत्व साहित्यिक चर्चांना नवी दिशा देईल असा विश्वास व्यक्त होत आहे. सातारा हे मराठा साम्राज्याचे मध्यवर्ती ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशज यांनी या भूमीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिले. याच भूमीत होणारे 99 वे मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करणारा ठरेल विश्वास पाटील यांच्यासारख्या ऐतिहासिक कादंबरीकार या संमेलनाचे नेतृत्व करत असल्याने मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासावर आधारित साहित्यिक चर्चांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. संमेलनात साहित्य इतिहास आणि संस्कृती यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे.
साताऱ्यात अध्यक्षपदाची संधी मिळणे ही अभिमानाची बाब : विश्वास पाटील
विश्वास पाटील यांनी साताऱ्यात अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की सातारा ही ऐतिहासिक नगरी असून या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणे हे त्यांच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. त्यांच्या गुरुस्थानी असलेल्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींचे गाव साताऱ्यात असल्याने या भूमीत कार्य करण्याची संधी अधिक अर्थपूर्ण वाटते सातारा ही थोरले शाहू महाराज यांची भूमी असून इथल्या आमदार खासदारांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणे ही सन्मानाची गोष्ट आहे. कोरेगावचे ना. व. आपटे, वाटेगावचे अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक आणि समाज पुरुष साताऱ्याच्या वर्षाचे मोठे आधारस्तंभ आहेत. पाचगणी येथे शालेय जीवनात त्यांनी वाचनालयातील शेकडो पुस्तके वाचून त्यांना लेखनाची गोडी लागली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सुरू केलेली ग्रंथालय चळवळ पुन्हा जोमाने उभी करणे आजची गरज असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. सध्या ही चळवळ काहीशी थांबलेली आहे परंतु फक्त एक गाव एका पुस्तकही योजना राबवून चालणार नाही तर प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी पुस्तकाचं गाव भरण आवश्यक आहे. ज्ञानाची भूक वाढवण्यासाठी आणि वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी शासनाकडे नक्कीच पाठपुरावा करू असे त्यांनी ठामपणे सांगितले ही चळवळच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व बौद्धिक उन्नतीची खरी असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.