सातारा : युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्वयंपाक गॅसच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. गॅस पुरवठा नियमित व सुरळीत करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे शहर समन्वयक सुनील काळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सध्या शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिक, गृहिणी तसेच छोटे व्यवसायिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चहा-नाष्टा केंद्र, हॉटेल, बेकरी तसेच गॅसवर चालणारे लघुउद्योग यावरही या टंचाईचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी राहुल पवार, सचिन बागल, सौ. मनीषा सांळुखे, सादिकअली बागवान, प्रणव सावंत, गणेश अहिवळे, अस्लम तडसकर, विजय निकम, सुवर्णा पाटील, समिंद्रा जाधव, संजना जगदाळे, सुषमा घोरपडे, तेजस्विनी केसरकर, अर्चना देशमुख, नलिनी जाधव, अमोल खुडे, दयानंद नागटिळक, अनिकेत साळुंखे, जितेंद्र बडेकर, अजय राठोड, शैलजा उदय, सोनम सुनील कोळेकर, योगिना विशाल कोळेकर, जयश्री संभाजी पवार, रुपाली सचिन भगत, रविराज बडदरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
या पार्श्वभूमीवर जिल्हा व शहर पातळीवर गॅस पुरवठा नियोजनबद्ध व नियमित करण्यात यावा, टंचाईचा गैरफायदा घेऊन काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच स्थानिक पातळीवर इंधन पुरवठा व्यवस्थापन व तक्रार निवारण समितीच्या बैठकांद्वारे समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. जनतेच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन शासनाने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.