अतित येथे बेकायदा देशी दारू विक्री करणाऱ्या तरुणावर कारवाई ; ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 23 November 2026


सातारा : अतित (ता. जि. सातारा) येथे विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्या तरुणावर बोरगाव पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ७२० रुपये किमतीचा देशी दारूचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज संतोष यादव (वय २८, रा. अतित, ता. जि. सातारा) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा विनापरवाना देशी दारूची विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून ७२० रुपये किमतीचा दारूचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
ही घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर खंडजोडे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सुरज यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कचरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण तालुक्यात जिंती, विडणी येथील दोन डीपी फोडून तांब्याच्या तारा चोरीला;अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
विलीनीकरणाची चर्चा थांबली; राष्ट्रवादीचे आठही खासदार शरद पवारांसोबत ठाम - शशिकांत शिंदे

संबंधित बातम्या