महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवारांनी एकूण नऊ आणि दहा प्रभागांमध्ये 78 उमेदवारांनी एकूण 114 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी मंगळवारी (दि. 18) झाली. यामध्ये नगराध्यक्षपदासाठीच्या चार आणि सदस्यपदांसाठीच्या सहा अर्जांवर घेण्यात आलेल्या हरकती निवडणूक निर्णय अधिकार्यांनी फेटाळल्या. त्यामुळे सर्व अर्ज वैध ठरले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी सुनील शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष), डी. एम. बावळेकर (लोकमित्र जनसेवा आघाडी व अपक्ष), नासीर मुलाणी, कुमार शिंदे, राजेश कुंभारदरे, संजय पाटील, सतीश सांळुखे (सर्व अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले.
प्रभाग 1 अ - युसूफ शेख (राष्ट्रवादी काँग्रेस), शंकर ढेबे (लोकमित्र जनसेवा आघाडी), राजू नालबंद, आशा ढेबे, सूरज आखाडे (सर्व अपक्ष), ब - विद्या बावळेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), नावेज बडाणे, झीनत चौगुले, प्रियांका बावळेकर (सर्व अपक्ष), प्रभाग 2 अ - संतोष आखाडे (राष्ट्रवादी काँग्रेस), किरण काळे (लोकमित्र जनसेवा आघाडी), प्रशांत आखाडे, असिफ सत्तार शेख, सुनीता आखाडे, आशा ढेबे (सर्व अपक्ष), ब - संगीता वाडकर (राष्ट्रवादी), सोनाली बांदल, अर्चना पाटणे (सर्व अपक्ष), प्रभाग 3 अ - विमल पारठे (राष्ट्रवादी काँग्रेस), पूजा उतेकर, आशा ढेबे (सर्व अपक्ष). ब - रवींद्र कुंभारदरे (भाजप), विशाल तोष्णीवाल (राष्ट्रवादी), हेमंत साळवी, प्रवीण जिमन (सर्व अपक्ष), प्रभाग 4 अ - संजय कदम (राष्ट्रवादी), बाळकृष्ण सांळुखे (लोकमित्र जनसेवा आघाडी), कुमार शिंदे, किरण शिंदे, सुमित कांबळे (सर्व अपक्ष), ब - वंदना ढेबे (राष्ट्रवादी), पूजा उतेकर, विमल ओंबळे, शर्मिला वाशिवले, विमल बिरामणे (सर्व अपक्ष), प्रभाग 5 अ - अपर्णा सलागरे (राष्ट्रवादी), सुरेखा देवकर, प्रभा नायडू, सना शेख, स्मिता पाटील (सर्व अपक्ष), ब - संजय जंगम (राष्ट्रवादी), राजेश कुंभारदरे, विजय नायडू, विशाल कुंभारदरे, प्रतीक जंगम (सर्व अपक्ष), प्रभाग 6 अ - नीता झाडे (अपक्ष), उषा कोंडके (राष्ट्रवादी), ब - संतोष शिंदे (राष्ट्रवादी), समीर सुतार, दुर्वेश प्रभाळे, राहुल भोसले, सतीश ओंबळे, मनोहर जाधव (सर्व अपक्ष), प्रभाग 7 अ - शबाना मानकर (अपक्ष), तरन्नुम वलगे (राष्ट्रवादी), ब - नासीर मुलाणी (राष्ट्रवादी), सलीम बागवान (अपक्ष), प्रभाग 8 अ - प्रियंका वायदंडे (राष्ट्रवादी), स्वप्नाली शिंदे, अश्विनी वायदंडे, शुभांगी शिंदे (सर्व अपक्ष), ब - राहुल पिसाळ (राष्ट्रवादी), राजेश कुंभारदरे, संगीता गोंदकर (सर्व अपक्ष), प्रभाग 9 अ - रेश्मा ढेबे (राष्ट्रवादी), संगीता हिरवे, मेघा ढेबे (सर्व अपक्ष), ब - अफजल सुतार (राष्ट्रवादी), आशिष चोरगे (लोकमित्र जनसेवा आघाडी), समीर सुतार व मोअज्जम नालबंद (अपक्ष), प्रभाग 10 अ - अश्विनी ढेबे (भाजप), सुनीता ढेबे (लोकमित्र जनसेवा आघाडी), पल्लवी कोंढाळकर (राष्ट्रवादी), लता आरडे, सीमा तोडकर, सुनीता आखाडे (सर्व अपक्ष), ब - रोहित ढेबे (राष्ट्रवादी), मनीष मोहिते (भाजप), विनोद गोळे व संदीप कोंढाळकर (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.