नरहर कुरुंदकर स्मरणार्थ येत्या मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी डॉ. राजा दिक्षितांचे व्याख्यान

by Team Satara Today | published on : 04 February 2026


सातारा :  महाराष्ट्रातील ख्यातकीर्त विचारवंत स्मृतीशेष नरहर कुरुंदकर यांच्या स्मरणार्थ येत्या मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह( थोरले ) महाराज नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती, निमंत्रक ज्येष्ठ  साहित्यिक विचारवंत विश्वास दांडेकर व जेष्ठ  विचारवंत  किशोर बेडकिहाळ यांनी दिली.

या विशेष व्याख्यानात मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष, इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजा दीक्षित 'नरहर कुरुंदकर यांची इतिहास दृष्टी' या  विषयावर बोलणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहावे,असे आवाहन नरहर कुरुंदकर विचारमंचचे दिनकर झिंब्रे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी
पुढील बातमी
श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात

संबंधित बातम्या