मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मॉर्फ केलेला फोटो प्रसारित केल्याप्रकरणी कारवाईची भाजपची मागणी

by Team Satara Today | published on : 09 September 2026


सातारा : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा कथित मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून सोशल मीडिया पेजवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या सातारा शहर मंडलाने केली आहे.
याबाबत भाजपचे सातारा शहर मंडल अध्यक्ष अविनाश (राजेंद्र) खर्शिकर यांनी सातारा शहर पोलीस ठाणे तसेच सायबर विभागाकडे निवेदन दिले आहे. महाविकास आघाडीशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या एका सोशल मीडिया पेज किंवा अकाउंटवरून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा बनावट व छेडछाड केलेला फोटो प्रसारित करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
या पोस्टमुळे संबंधित व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा तसेच जनमानसात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे भाजपने निवेदनात म्हटले आहे. सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या मजकुरामुळे सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
सदर फोटो तयार करणाऱ्या, तो प्रसारित करणाऱ्या व्यक्ती तसेच संबंधित सोशल मीडिया पेजच्या प्रशासकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि लागू माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित पोस्ट हटवून सोशल मीडिया अकाउंटवर कायदेशीर प्रक्रियेनुसार आवश्यक ती कारवाई करावी, अशीही मागणी भाजपने केली आहे.
निवेदनासोबत आक्षेपार्ह पोस्टचा स्क्रीनशॉट आणि संबंधित सोशल मीडिया पेजची लिंक पुराव्यादाखल जोडण्यात आल्याचे खर्शिकर यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोषणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न; ९ वा राष्ट्रीय पोषण माह-२०२६ सुरू
पुढील बातमी
प्रतिसरकार स्मारकाच्या जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न? जेसीबी घेऊन आले; वैध कागदपत्रे दाखवता न आल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

संबंधित बातम्या