12:28pm | Sep 04, 2024 |
मुंबई : गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच इथं एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आणि राज्यातील अनेक एसटी आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं. काही आगारांमधून एकही एसटी प्रवासाला निघाली नाही. ज्यामुळं प्रवाशांचे आतोनात हाल झाले. प्रामुख्यानं कोकणच्या दिशेनं निघालेल्या चाकरमान्यांकडे एसटीचं आरक्षण असताना त्यांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हे सारं चित्र पाहता इथं एसटीमुळं खोळंबा होत असतानाच तिथं कोकण रेल्वे पुन्हा एकदा कोकणकरांच्या मदतीला धावली आहे.
X च्या माध्यमातून कोकण रेल्वेनं अधिकृत माहिती देत आणखी एक गणपती विशेष रेल्वे चालवली जाणार असल्याचं सांगितलं. 'प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त आणखी एक अनारक्षित ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे', असं कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलं.
कोकण रेल्वेच्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01103/01104 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघून कुडाळ आणि पुन्हा सीएसएमटी असा पूर्ण प्रवास करेल.
गाडी क्रमांक 01103 मुंबई छशिमट- कुडाळ विशेष (अनारक्षित)ट्रेन निर्धारित स्थानकातून 4 आणि 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी कुडाळ रोखानं प्रवास सुरु करेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता कुडाळला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01104 कुडाळ- मुंबई छशिमट (विशेष) अनारक्षित निर्धारित स्थानकातून 5 आणि 7 सप्टेंबरला पहाटे 4.30 वाजता प्रवास सुरू करून त्याच दिवशी सायंकाळी 4.40 वाजता मुंबईत पोहोचेल.
अधिकृत माहितीनुसार या गाडीला 20 कोच असून त्यापैकी 14 कोच जनरल श्रेणीतील असतील, तर चार कोच स्लीपर असतील. या रेल्वेसंदर्भातील सविस्तर माहितीसाठी प्रवाशांना रेल्वेच्या वेबसाईटसह आयआरसीटीसी (IRCTC)च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यासह खासगी ठेकेदार लाचलुचपतच्या जाळ्यात |
महादरेच्या डोंगरात तरुणाची आत्महत्या |
संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडचा एसआयटीने घेतला ताबा |
दुकान फोडून साहित्य चोरी करणारा जेरबंद |
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन संचलनात शिवम इंगळे करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व |
सातारा जिल्ह्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा |
महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांची झाशीच्या रेल्वे स्थानकावर मोठी चेंगराचेंगरी |
खंडणीसाठी दहशत माजवणाऱ्यांना अटक |
सन 2019 पूर्वी उत्पादित व नोंदणी झालेल्या सर्व प्रकारातील वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक |
ऊस जळून आठ शेतकऱ्यांचे पाच लाखांचे नुकसान |
राष्ट्रीय मानवी तस्करी जनजागृती दिनानिमित्त विधी साक्षरता शिबीर व रॅलीचे आयोजन |
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त काव्य लेखन स्पर्धा |
आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘यांत्रिक हजेरी’ अनिवार्य याशनी नागराजन यांचा निर्णय |
मारहाणीसह नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |

निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडले; सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास |
सातारा शहराच्या पश्चिम भागात दोन दिवस पाणी नाही |
अंजली दमानिया यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी : रतन पाटील |
समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी ग्रंथ वाचनातून येते |
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद |