पोक्सो गुन्ह्यातील एकास पोलीस कोठडी

by Team Satara Today | published on : 28 June 2026


कराड  : पोक्सो गुन्ह्यातील एकास कराड न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रमोद अंकुश लोकरे वय 22 रा. येरवळे, ता. कराड याने अल्पवयीन असलेल्या एका मुलीस फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी लोकरे यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला काल दिनांक 27 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केल्यानंतर आज दिनांक 28 रोजी कराडचे पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश संतोष शिंदे यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांची मागणी तसेच सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने लोकरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कराड शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विलासपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप; संग्राम बर्गे व मित्र परिवाराचा उपक्रम

संबंधित बातम्या