ग्रहांची परेड पाहण्यासाठी बालचमूसह पालकांचा प्रतिसाद

सातारा : आकाशाच्या मैदानात मंगळवार, दि. २१ रोजी रात्री आठ वाजता सहा ग्रहांची जणू परेड पाहायला मिळाली. ही प्लॅनेट परेड पाहण्याचा लाभ विद्यार्थ्यांनी कोडोली शाळेच्या मैदानावर अधिकाऱ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या उपस्थितीत घेतला. आकाशाच्या पटलावर रात्री आठ नंतर हा अनोखा खेळ रंगला. यावेळी शुक्र, मंगळ, शनी, नेपच्यून आणि युरेनस हे सहा ग्रह एका रेषेत दिसून आले. गुरु,मंगळ, शुक्र ,शनि हे ग्रह उघड्या डोळ्यांनी आकाशाच्या पटलावर पाहता आले.

ही सुंदर प्लॅनेट परेडची लाईव्ह कॉमेंट्री कोडोली शाळेचे उपशिक्षक म्हेत्रे सर यांनी केली. मुख्याध्यापक जायकर यांनी मुलांना या खगोलीय घटनेचे वैज्ञानिक रहस्य स्पष्ट करून सांगितले.ज्यावेळी एकापेक्षा अधिक ग्रह पृथ्वीच्या समांतर एका रेषेत दिसतात त्यावेळी त्याला ग्रहांचे संरेषण किंवा प्लॅनेट परेड म्हटले जाते.ज्यावेळी सर्व ग्रह सूर्याच्या एकाच बाजूला असतात अर्थात वास्तवात हे ग्रह एकाच सरळ रेषेत असत नाहीत. मात्र पृथ्वीच्या स्वत:च्या कक्षेतील भ्रमणामुळे या आकाशात एकाच जागी दिसून येतात. अशी खगोलीय माहिती सांगून येत्या ८ मार्चला मंगळ, गुरु, युरेनस, शुक्र,नेपच्यून, शनी आणि बुध या सात ग्रहांची परेड चांदोबा गुरुजींच्या शाळेत पुन्हा पाहता येईल अशी माहिती दिली.

यावेळी ग्रहांची ही पर्वणी पाहण्यासाठी मैदानावर सर्व व्यवस्था शाळा व पालकांमार्फत करण्यात आली होती. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी प्राथ. शबनम मुजावर, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, रवी साळुंखे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव, केंद्रप्रमुख मगर, सरपंच सौ. भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. साळुंखे, शिवाजीराव जाधव यांनी सदर प्लॅनेट परेडचा नयनरम्य आस्वाद घेतला. काळंगे सर यांनी आभार मानले.
मागील बातमी
आसगावच्या माझी वसुंधरा अभियान, ग्रामस्थांच्या एकीने ठरले स्वाभिमान....
पुढील बातमी
स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस यांचे योगदान मोलाचे : डॉ. सुरेशराव जाधव

संबंधित बातम्या