रत्नागिरी : अचानक चक्कर आल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलेल्या एका १७ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना साेमवार, २६ ऑक्टाेबर राेजी सकाळी घडली. रणवीर सुरेंद्र कल्याणकर (रा. विंग, कराड, सातारा) असे त्याचे नाव असून ताे रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत हाेता.
रणवीर कल्याणकर हा अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत हाेता. ताे शहरातील अभ्युदयनगर येथील साेनाली सावंत यांच्याकडे भाड्याने पेईंग गेस्ट म्हणून राहत हाेता. त्याच्या साेबत अन्य दाेन विद्यार्थीही राहत हाेते. साेमवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान त्याला अचानक चक्कर आली. याबाबत घर मालकीन सावंत यांनी त्याचे वडील सुरेंद्र वसंत कल्याणकर यांना फाेन करून माहिती दिली. तसेच त्याला आम्ही जिल्हा रुग्णालयात दाखल केल असून तुम्ही तिथे या असे सांगितले.
त्यानुसार सुरेंद्र कल्याणकर तातडीने खासगी गाडीने रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. नूतन सातगडे यांनी रणवीर याच्यावर उपचार सुरू असताना मयत झाल्याचे जाहीर केले. याबाबत सुरेंद्र कल्याणकर यांनी शहर पोलिस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.
अचानक चक्कर आल्याने रत्नागिरीत अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कराड तालुक्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू
by Team Satara Today | published on : 28 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा