सातारा : नुकसान प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास माची पेठ, सातारा येथील अमर मदनसा झाड यांच्या भिंतीचे नुकसान केल्याप्रकरणी तेथीलच मृतुजा फकरुद्दीन भोरी, जैनब मृतुजा भोरी यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर करीत आहेत.