सातारा : विवाहितेस शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याची सुमारास सातारा शहरात राहणार्या विवाहितेस शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी जुबेर मनोहर सय्यद, वसीम मुस्ताक सय्यद, साबित मुस्ताक सय्यद आणि एक महिला सर्व रा. आंबेदरे रोड, सातारा यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.