सातारा : सातारा शहरात दोन ठिकाणी अनाधिकृतपणे फ्लेक्स लावल्या प्रकरणी 12 जणांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी गोडोली येथील साईबाबा मंदिरासमोर नगरपालिकेची परवानगी घेतल्याविना फ्लेक्स लावल्याप्रकरणी सौरभ कैलास खरात रा. गुरुवार पेठ सातारा, संदीप सुनील मोरे, रोहित संजय साळुंखे दोघेही रा. गोडोली, सातारा आणि राज सुनिल यादव रा. कोडोली सातारा या चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, राजवाडा गांधी मैदानावर अनधिकृतपणे फ्लेक्स लावल्या प्रकरणी कुकीभाऊ खरात व त्याचे सहकारी, पियुष पवार, साहिल शेख, यश चव्हाण, ऋषी येवले, साहिल येवले, आर्यन जगदाळे, आर्यन पोफळे (पूर्ण नाव पत्ते माहीत नाहीत) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार इंगळे करीत आहेत.