सातारा : करंजे नाका परिसरातील प्रमिला मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून आरडा-ओरडा करत शांतता भंग केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील सावंत यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम तानाजी खवले (वय २३, रा. वाढे, ता. जि. सातारा, सध्या सैदापूर) आणि अक्षय विश्वनाथ ननावरे (वय २७, रा. नगर, ता. जि. सातारा) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दोघांनी मद्यपान सेवन करून सार्वजनिक रस्त्यावर आरडा-ओरडा करत असभ्य वर्तन केले व परिसरातील शांतता भंग केली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.