पर्यावरणपुरक गणेश विसजर्नाचा कोंढवली गावाने घालून दिला आदर्श

by Team Satara Today | published on : 05 September 2025


सातारा : राज्य शासनाकडून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन केले आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून कोंढवली ता. सातारा या गावाने या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन इतर गावांना आदर्श घालून दिला आहे. कोंढवली गावच्या घरगुती गणेश विसर्जनाच्या मुर्ती लिंब गावच्या नदीपात्रात विसर्जित करण्यात येतात. बऱ्याच गणेशमुर्ती पीओपीच्या असल्याने कोंढवलीकरांनी नदी प्रदुषण टाळण्यासाठी विसर्जनाच्या मुर्ती विधीवत पूजा करुन लिंब ग्रामपंचायत प्रशासनाकडे सूपूर्द केल्या. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी कोंढवली गावात जाऊन पर्यावरणपूरक विसर्जन करण्याविषयी प्रबोधन केले. याला प्रतिसाद देऊन कोंढवली ग्रामस्थांनी विसर्जनाच्या मुर्ती लिंब ग्रामपंचायत प्रशासनाकडे सूपूर्त केल्या.

लिंब गावचे येत्या शनिवारी विसर्जन असून पर्यावरणपूरक विसर्जन करण्सासाठी लिंब गावच्या गणेश मंडळांची व प्रतिष्ठीत नागरीकांची बैठक घेऊन गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करुन गावात याविषयी गावात प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी लिंब ग्रामपंचायतीचे प्रशासक विस्तार अधिकारी श्री. जाधव, लिंब गावचे ग्राम विकास अधिकारी चव्हाण, जिल्हा माहिती कार्यालयातील वैभव जाधव व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गडांचा राजा : राजगड
पुढील बातमी
अभिजीत भोईटे यांनी सर केले किलीमांजारो शिखर

संबंधित बातम्या