12:55pm | Dec 05, 2024 |
सातारा : उद्योग क्षेत्राची कमी माहिती आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे अनेकजण उद्योजकतेकडे वळण्यात मागे पडतात. त्यामुळे युवक, युवतींमध्ये उद्योजकतेचे प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेऊन अमृत संस्थेने हे महत्वकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्यात अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण योजना, अमृत-आयात निर्यात प्रशिक्षण योजना आणि अमृत- बेकरी प्रशिक्षण या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.
अमृत संस्थेच्या सोलर पी.व्ही. इंस्टॉलेशन, आयात-निर्यात आणि अमृत-बेकरी प्रशिक्षण योजना या तिन्ही निवासी प्रशिक्षण योजनांचा कालावधी १८ दिवसांचा आहे. यात ८०% तांत्रिक प्रशिक्षण व २०% उद्योजकता विकास यावर भर देण्यात येणार आहे. आयात-निर्यात प्रशिक्षण यामध्ये आयात-निर्यात प्रक्रिया, परकीय व्यापार धोरण याबद्दल मार्गदर्शनही केले जाणार आहे. सूर्यमित्र प्रशिक्षण, अमृत-बेकरी प्रशिक्षण योजनेत फक्त तांत्रिक ज्ञानच मिळणार नसून उद्योग उभारणीसाठी मदत केली जाणार आहे. योजनांची वैशिष्ठ्ये म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रकल्प अहवाल, कर्ज प्रस्ताव, उद्योग नोंदणी, कच्चा माल खरेदी याबाबत अमृत संस्था मार्गदर्शन करणार आहे. युवक, युवती www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन श्रीमती पाटील यांनी केले आहे.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |