04:38pm | Nov 16, 2024 |
कोल्हापूर : भाजपासोबत गेलो नसतो तर पुन्हा तुरुंगात जावे लागले असते, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. तसेच एकदा मी सहा महिने तुरुंगात जाऊन आलो, तिथे जाण्याचा अनुभव घेतला आहे. आता पुन्हा नको. आम्ही तुम्हाला हात जोडत आहोत. आम्ही भाजपासोबत जात आहोत तुम्ही सुद्धा या, असे भुजबळ म्हणाले होते. त्यावर मी त्यांना म्हटले, ज्यांचे हात कुठेतरी बरबटलेले असतात, भ्रष्टाचारात सहभागी झाले असतात त्यांना चिंता आहे. माझ्या सारख्याला चिंता नाही, असे म्हणत शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. गडहिंग्लजमध्ये समरजीत घाटगेंच्या प्रचार सभेच्या दरम्यान ते बोलत होते.
तसेच महाराष्ट्राला फसवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्राला सन्मानाची वागणूक मिळत नाही. यासाठी एकसंघ होऊन महाराष्ट्राच्या पदरात न्याय मिळेल, याची खबरदारी घेण्याची गरज होती. मात्र, याला साथ देण्याऐवजी आमचे काही लोक पळून गेल्याचे पवार म्हणाले आहेत. तसेच तुमच्या आमदारांनी हळूच कानात सांगितले, तुम्ही आमच्याबाबत विचार केला नाही तर आम्हाला आतमध्ये जावे लागेल. त्यानंतर काही दिवसांनी वाचायला मिळाले त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली.
पुढे ते म्हणाले, सोडून गेलेले लोक एक दिवशी भेटायला आले होते. आम्ही सर्वजण काहीतरी वेगळा विचार करतोय. तुम्ही आमच्याबरोबर चला, असे त्यांनी त्यावेळी मला सांगितले. मात्र मी त्यांना स्पष्ट सांगितले की, त्याच्यासोबत जाणे मला पटणारं नाही. ज्यांनी तुम्हाला विरोध केला, त्यांच्या दावणीला जाऊन बसायचे का? हे माझ्याकडून शक्य नाही. तुम्हाला काही करायचे असेल तर करा मात्र हे योग्य नाही. या गोष्टीला आम्ही कदापी पाठिंबा देणार नाही, असे पवार त्यावेळी म्हणाले आहेत.
मराठा महासंघाचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा |
सूज्ञ मतदार 20 तारखेला उद्वेग व्यक्त करतील |
बारामतीच्या सुभेदारीवरून शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला |
भाजप उमेदवाराला कराडकरांकडे मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही : शिवराज मोरे |
आ.शशिकांत शिंदे यांच्या हाती राज्याचे सरकार द्यायचे आहे |
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा कराडमध्ये बहुसंख्येने करण्यात आला निषेध |
रामायण, महाभारतातील जीवनमूल्य छत्रपती शिवरायांच्या चरित्रात : गोविंद देवगिरी |
ब्राझीलला असताना त्यांना भुमिपुत्र आठवला नाही का ? : शशिकांत शिंदे |
अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली : जयकुमार गोरे |
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पत्नीच्या खून प्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार |
वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा कराडमध्ये बहुसंख्येने करण्यात आला निषेध |
रामायण, महाभारतातील जीवनमूल्य छत्रपती शिवरायांच्या चरित्रात : गोविंद देवगिरी |
ब्राझीलला असताना त्यांना भुमिपुत्र आठवला नाही का ? : शशिकांत शिंदे |
अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली : जयकुमार गोरे |
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पत्नीच्या खून प्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार |
वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा शहर पोलिसांनी केले 170 गुन्हेगार हद्दपार; 668 सराईतांवर प्रतिबंधक कारवाई |
भाजपने राज्य अस्थिर ठेवण्याचे काम केले : अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर |
बचेंगे तो और भी लढेंगे और जितेंगे भी : नितीन बानुगडे पाटील |
जिल्हाधिकाऱ्यांनी वितरित केले ई-मतदार प्रतिज्ञा प्रमाणपत्र |
अमित दादांसाठी प्रचारक पोहोचले शेताच्या बांधावर |