सातारा : ढोल पथकातून बाहेर पडल्याच्या कारणावरून एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील सिटी पोस्ट परिसरात चंदन सुरेश बोराटे (रा. सोमवार पेठ सातारा) याला ढोल पथकातून का बाहेर पडला, या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी अभिषेक नाळे (रा. शाहूनगर), अनिकेत पार्टे (रा. तालीम संघ०, राहुल कदम (रा. ढोणे कॉलनी सातारा,पूर्ण नावे माहीत नाहीत) या तिघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार वरे करीत आहेत.
ढोल पथकातून बाहेर पडल्याच्या कारणावरून साताऱ्यात एकास मारहाण; तिघांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 22 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा